Posts

Showing posts from August, 2023

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शवत: डॉ.सतीशकुमार पडोळकर

 अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शवत: डॉ.सतीशकुमार पडोळकर जत (प्रतिनिधी): भारताच्या इतिहासात अहिल्यादेवींचे नाव एक सतशील,  युगकर्ती, विवेकशील राज्यकर्ती, न्यायी राजमाता,लोकमाता म्हणून कोरलं गेलं आहे.पुण्यश्लोक हे नामाभिधान त्यांना जनतेने बहाल केले आहे.राज्यकर्त्याकडे कोणते सद्गुण असावेत याचे एकमेव मूर्तीमंत आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर होय. राज्यात पुनर्वसन, न्याय व्यवस्था व उद्योग व्यवसायाला पाठबळ कसे द्यावे याचा वस्तुपाठच अहिल्यादेवींनी घालून दिलेला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शवत असे आहे, असे प्रतिपादन डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथील कनिष्ठ विभागाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मृती दिननिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बी.बी.पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी जातिप्रथा निर्मूलन असेल किंवा...

कुशल प्रशासक :आहिल्यादेवी होळकर. - डॉ. सतीशकुमार पडोळकर

 कुशल प्रशासक :आहिल्यादेवी होळकर        भारतामध्ये  राष्ट्रहित व मानव हिताच्या सदरक्षणासाठी समर्पित महिलांची एक गौरवशाली परंपरा राहिली आहे. त्यामध्ये मैत्रेयी व गार्गी सारख्या विदूषी महिलांनी आपल्या बुद्धीसामर्थ्याने जगाला दिपविले तर राणी चन्नमा , राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या मृदानगी ने लढाईचे रणांगण गाजविले.तर राजमाता जिजाऊंनी स्वतंत्र स्वराज्याची ज्योत पेटविली.अशा अनेक महिला इतिहास पृष्ठावर अजरामर झाल्या आहेत. या पानातील एक सुवर्णाक्षरी पृष्ठ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आहे. आपल्या निर्मळ चारित्र्य संपन्न व्यक्तित्वाने त्या समाजकारण, धर्मकारण व राजकारणाच्या क्षेत्रात परमआदरणीय ठरल्या.संपूर्ण मानव समाजाच्या कल्याणासाठी व  समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांचे संपुर्ण जीवन जनकल्याणासाठीच समर्पित होते.त्यांनी आपल्या अखंड 28 वर्षांच्या राज्यकारभारामध्ये अनेक जनपयोगी कामे केली.त्या एक कुशल प्रशासक होत्या आणि त्यांचे प्रशासकीय कसब आजच्या संदर्भात ही तितकेच प्रासंगिक आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जीवन...