अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शवत: डॉ.सतीशकुमार पडोळकर

 अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शवत: डॉ.सतीशकुमार पडोळकर

जत (प्रतिनिधी): भारताच्या इतिहासात अहिल्यादेवींचे नाव एक सतशील,  युगकर्ती, विवेकशील राज्यकर्ती, न्यायी राजमाता,लोकमाता म्हणून कोरलं गेलं आहे.पुण्यश्लोक हे नामाभिधान त्यांना जनतेने बहाल केले आहे.राज्यकर्त्याकडे कोणते सद्गुण असावेत याचे एकमेव मूर्तीमंत आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर होय. राज्यात पुनर्वसन, न्याय व्यवस्था व उद्योग व्यवसायाला पाठबळ कसे द्यावे याचा वस्तुपाठच अहिल्यादेवींनी घालून दिलेला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शवत असे आहे, असे प्रतिपादन डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथील कनिष्ठ विभागाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मृती दिननिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.


       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बी.बी.पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी जातिप्रथा निर्मूलन असेल किंवा न्याय प्रणाली असेल याची अंमलबजावणी स्वतः पासून केली. त्यामुळे त्या आदर्शवत आहेत.

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. काळे यांनी केले तर आभार प्रा.दिनेश वसावे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सुरेश पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

भारतीयतेचे दूसरे रूप म्हणजे हिंदी: प्राचार्य डॉ.सुरेश पाटील

राजे रामराव महाविद्यालयात अंधश्रद्धा: प्रभाव, परिणाम व उपाय या विषयावर कार्यशाळा संपन्न

मनुस्मृती पुरुस्कृत दुसऱ्या प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर आपण आहोत का? -डॉ.सतीशकुमार पडोळकर