भारतीयतेचे दूसरे रूप म्हणजे हिंदी: प्राचार्य डॉ.सुरेश पाटील
जत (प्रतिनिधी): हिंदी भाषा ही स्वातंत्र्य चळवळीची व देश प्रेमाची भाषा असल्याने भारतीयता हा या भाषेचा आत्मा आहे. देशाला एकत्रितपणे बांधून ठेवण्याची क्षमता हिंदी भाषेत असल्याने खऱ्या अर्थाने हिंदी भाषा हीच राष्ट्र भाषेची अधिकारिणी आहे. असे प्रतिपादन राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले. ते हिंदी विभागाच्या वतीने 14 सप्टेंबर हिंदी दिवस निमित्त आयोजित ' भित्तीपत्रिकेच्या उद्घाटन ' प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख प्रा.एच. डी. टोंगारे होते. यावेळी बोलताना त्यांनी हिंदी दिवसानिमित्त सात दिवसांमध्ये घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देवून विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी कुमारी सानिका लवटे, अक्षता व्हनखंडे, दीक्षा लवटे, सिद्धी शर्मा, अश्विनी माळी, स्वप्नाली बामणे या विद्यार्थिनींनी भित्तुपत्रिकेचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अक्षता व्हनखंडे हिने तर आभार सानिका लवटे ने मानले. या कार्यक्रमासाठी हिंदी विभागाचे डॉ. सतीशकुमार पडोळकर, प्रा.लता करांडे यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment