Posts

Showing posts from July, 2023

खरचं सांगतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा!

 खरचं सांगतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा! फेसबुक, व्हॉट्स अप वर गांधी  घरा-घरात पोहचला, जसा तो होता त्याच्या  अगदी विपरीत पोहचला खरचं सांगतोय तुम्हाला बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा! सत्य,अहिंसा,सदाचार आता कुठे राहिला आहे? हे राम! च्या ठिकाणी आता जय श्रीराम! लोकांना भावला आहे. दिवस गेले , काळ बदलला, गांधींचा राम ही बदलला खरचं सांगतोय तुम्हाला बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा! संवाद गेला, विवाद आला  चरख्यावरून गांधी ही गेला उठला सुटला कोणीही बसला, टोपी घालून आंधी झाला लोकांसाठी गांधी झाला. म्हणूनच म्हणतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा! उरलं, सुरलं सारं झालं अस्थींना ही चोरून नेलं हिंदुत्वाचा कलंक झाला गद्दाराच्या यादीत गांधी आला म्हणूनच म्हणतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा! म्हणूनच म्हणतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा झाले गेले विसरून जा  गांधींचे लाड सोडून द्या राष्ट्रपिता तो कसला? नवा राष्ट्रपिता  आता आला म्हणूच खरचं सांगतोय तुम्हाला बस्स झालं गांधींना आता रिटायर्ड करा! -सतीशकुमार पडोळकर

मनुस्मृती पुरुस्कृत दुसऱ्या प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर आपण आहोत का? -डॉ.सतीशकुमार पडोळकर

  मनुस्मृती पुरुस्कृत दुसऱ्या प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर आपण  आहोत का?  -डॉ.सतीशकुमार पडोळकर  सन १९४९ च्या २५ नोव्हेंबर रोजी, राज्यघटनेचा मसुदा पूर्ण तयार झाल्याचा आनंद संविधान सभेतील सर्वच सदस्यांना असतांना, या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख म्हणून संविधनाचे महत्वाचे शिल्पकार असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मात्र अस्वस्थ होते. लोकशाहीवादी राज्यघटनेच्या भवितव्याविषयी ही अस्वस्थता आपल्या भाषणातून व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “माझ्या मनात आज आपल्या देशाच्या भवितव्याचेच विचार आहेत. भारतास संसदीय कार्यपद्धती माहीतच नव्हती, असे नाही. बौद्ध संघ साऱ्याच संसदीय कार्यपद्धतींचे पालन करीत आणि या पद्धती बौद्धांनी तत्कालीन राजसभांकडून घेतल्या होत्या, असे मानण्यास जागा आहे. ही लोकशाहीवादी पद्धती भारत कालौघात हरवून बसला. त्यामुळेच अशी दाट शक्यता वाटते की, आपली नव्याने जन्माला आलेली लोकशाही वरवर पाहता अबाधित भासेल, पण वास्तवात तिचे रुपांतर हुकुमशाहीत, एकाधिकारशाहीत होईल. या दुसऱ्या शक्यतेचा धोका खरोखरच अधिक दिसतो.”  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेला हा ध...

मंगळवेढे भूमी संतांची - डॉ.सतीशकुमार पडोळकर

  भारतीय इतिहासाचा गौरवशाली वारसा असणारी ‘मंगळवेढा’ नगरी ही धर्म, अध्यात्म, साहित्य, समाजप्रबोधन व नैतिक राजकारणाची जगभर छाप सोडणाऱ्या महापुरुषांची भूमी आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक व भक्तीच्या क्षेत्रात एक विधायक घुसळण करणारी व विवेकाचा आवाज बुलंद करणारी मंगळवेढ्याच्या मातीत उगवली. अशा या हाडामासाच्या माणसांनी देशाच्या तत्कालीन सांस्कृतिक, अध्यात्मिक व सामाजिक रूढी-परंपरेच्या विरोधात बंड पुकारले. ‘विद्रोह’ हा या मातीचा गुणधर्म आहे. संत व महापुरुषांच्या पदस्पर्शानॆ व कार्यांनॆ पावन झालेली ही भूमी. मंगळवेढा ही नगरी प्राचीन कलावैभवाची साक्षीदार आहे. इथं बुद्ध, जैन, नाथ, शैव-वैष्णव अशा अनेक संस्कृती व संप्रदायाचे भग्न अवशेष सापडतात. या मातीत अनेक विचार वाढले, रुजले व मानवतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले. मंगळवेढ्यात इ.स. १०६ ते इ.स. १८१८ च्या काळात चालुक्य, देवगिरीचे यादव, कलचुरी, बहामनी, अदिलशाही, छत्रपती शाहू अनेक राज्यकर्त्यांचा अंमल होता. याच मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्यात १८ नोव्हेंबर १६६५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज व राजा जयसिंग यांची भेट झाली होती....