खरचं सांगतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा!
खरचं सांगतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा!
फेसबुक, व्हॉट्स अप वर गांधी
घरा-घरात पोहचला,
जसा तो होता त्याच्या
अगदी विपरीत पोहचला
खरचं सांगतोय तुम्हाला बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा!
सत्य,अहिंसा,सदाचार आता
कुठे राहिला आहे?
हे राम! च्या ठिकाणी आता जय श्रीराम! लोकांना भावला आहे.
दिवस गेले , काळ बदलला, गांधींचा राम ही बदलला
खरचं सांगतोय तुम्हाला बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा!
संवाद गेला, विवाद आला
चरख्यावरून गांधी ही गेला
उठला सुटला कोणीही बसला, टोपी घालून आंधी झाला
लोकांसाठी गांधी झाला.
म्हणूनच म्हणतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा!
उरलं, सुरलं सारं झालं
अस्थींना ही चोरून नेलं
हिंदुत्वाचा कलंक झाला
गद्दाराच्या यादीत गांधी आला
म्हणूनच म्हणतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा!
म्हणूनच म्हणतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा
झाले गेले विसरून जा
गांधींचे लाड सोडून द्या
राष्ट्रपिता तो कसला?
नवा राष्ट्रपिता आता आला
म्हणूच खरचं सांगतोय तुम्हाला बस्स झालं गांधींना आता रिटायर्ड करा!
-सतीशकुमार पडोळकर
Comments
Post a Comment