Posts

राजे रामराव महाविद्यालयात अंधश्रद्धा: प्रभाव, परिणाम व उपाय या विषयावर कार्यशाळा संपन्न

Image
 राजे रामराव महाविद्यालय, जत अग्रणी महाविद्यालय योजना, मुक्तपीठ, हिंदी विभाग, विवेक वाहिनी, ग्रंथालय, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समिती,जत यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बापूजी साळुंखे विचारमंच ' मुक्तपीठ ' येथे ' अंधश्रद्धा: प्रभाव, परिणाम व उपाय ' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. विनायक माळी Vinayak Mali हे उपस्थित होते. कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्रा.एच.डी. टोंगारे हे उपस्थित होते. या कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सुरेश पाटील सरांचे Suresh Patil विशेष असे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्याच्या काही छबी.

भारतीयतेचे दूसरे रूप म्हणजे हिंदी: प्राचार्य डॉ.सुरेश पाटील

Image
जत (प्रतिनिधी): हिंदी भाषा ही स्वातंत्र्य चळवळीची व देश प्रेमाची भाषा असल्याने भारतीयता हा या भाषेचा आत्मा आहे. देशाला एकत्रितपणे बांधून ठेवण्याची क्षमता हिंदी भाषेत असल्याने खऱ्या अर्थाने हिंदी भाषा हीच राष्ट्र भाषेची अधिकारिणी आहे. असे प्रतिपादन राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले. ते हिंदी विभागाच्या वतीने 14 सप्टेंबर हिंदी दिवस निमित्त आयोजित ' भित्तीपत्रिकेच्या उद्घाटन ' प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख प्रा.एच. डी. टोंगारे होते. यावेळी बोलताना त्यांनी हिंदी दिवसानिमित्त सात दिवसांमध्ये घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देवून विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी कुमारी सानिका लवटे, अक्षता व्हनखंडे, दीक्षा लवटे, सिद्धी शर्मा, अश्विनी माळी, स्वप्नाली बामणे या विद्यार्थिनींनी भित्तुपत्रिकेचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अक्षता व्हनखंडे हिने तर आभार सानिका लवटे ने मानले.  या कार्यक्रमासाठी हिंदी विभागाचे डॉ. सतीशकुमार पडोळकर, प्रा.लता करांडे यांच्यासह विद्यार्थी बहुसंख...

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शवत: डॉ.सतीशकुमार पडोळकर

 अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शवत: डॉ.सतीशकुमार पडोळकर जत (प्रतिनिधी): भारताच्या इतिहासात अहिल्यादेवींचे नाव एक सतशील,  युगकर्ती, विवेकशील राज्यकर्ती, न्यायी राजमाता,लोकमाता म्हणून कोरलं गेलं आहे.पुण्यश्लोक हे नामाभिधान त्यांना जनतेने बहाल केले आहे.राज्यकर्त्याकडे कोणते सद्गुण असावेत याचे एकमेव मूर्तीमंत आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर होय. राज्यात पुनर्वसन, न्याय व्यवस्था व उद्योग व्यवसायाला पाठबळ कसे द्यावे याचा वस्तुपाठच अहिल्यादेवींनी घालून दिलेला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शवत असे आहे, असे प्रतिपादन डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथील कनिष्ठ विभागाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मृती दिननिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बी.बी.पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी जातिप्रथा निर्मूलन असेल किंवा...

कुशल प्रशासक :आहिल्यादेवी होळकर. - डॉ. सतीशकुमार पडोळकर

 कुशल प्रशासक :आहिल्यादेवी होळकर        भारतामध्ये  राष्ट्रहित व मानव हिताच्या सदरक्षणासाठी समर्पित महिलांची एक गौरवशाली परंपरा राहिली आहे. त्यामध्ये मैत्रेयी व गार्गी सारख्या विदूषी महिलांनी आपल्या बुद्धीसामर्थ्याने जगाला दिपविले तर राणी चन्नमा , राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या मृदानगी ने लढाईचे रणांगण गाजविले.तर राजमाता जिजाऊंनी स्वतंत्र स्वराज्याची ज्योत पेटविली.अशा अनेक महिला इतिहास पृष्ठावर अजरामर झाल्या आहेत. या पानातील एक सुवर्णाक्षरी पृष्ठ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आहे. आपल्या निर्मळ चारित्र्य संपन्न व्यक्तित्वाने त्या समाजकारण, धर्मकारण व राजकारणाच्या क्षेत्रात परमआदरणीय ठरल्या.संपूर्ण मानव समाजाच्या कल्याणासाठी व  समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांचे संपुर्ण जीवन जनकल्याणासाठीच समर्पित होते.त्यांनी आपल्या अखंड 28 वर्षांच्या राज्यकारभारामध्ये अनेक जनपयोगी कामे केली.त्या एक कुशल प्रशासक होत्या आणि त्यांचे प्रशासकीय कसब आजच्या संदर्भात ही तितकेच प्रासंगिक आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जीवन...

खरचं सांगतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा!

 खरचं सांगतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा! फेसबुक, व्हॉट्स अप वर गांधी  घरा-घरात पोहचला, जसा तो होता त्याच्या  अगदी विपरीत पोहचला खरचं सांगतोय तुम्हाला बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा! सत्य,अहिंसा,सदाचार आता कुठे राहिला आहे? हे राम! च्या ठिकाणी आता जय श्रीराम! लोकांना भावला आहे. दिवस गेले , काळ बदलला, गांधींचा राम ही बदलला खरचं सांगतोय तुम्हाला बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा! संवाद गेला, विवाद आला  चरख्यावरून गांधी ही गेला उठला सुटला कोणीही बसला, टोपी घालून आंधी झाला लोकांसाठी गांधी झाला. म्हणूनच म्हणतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा! उरलं, सुरलं सारं झालं अस्थींना ही चोरून नेलं हिंदुत्वाचा कलंक झाला गद्दाराच्या यादीत गांधी आला म्हणूनच म्हणतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा! म्हणूनच म्हणतोय बस्स झालं आता गांधींना रिटायर्ड करा झाले गेले विसरून जा  गांधींचे लाड सोडून द्या राष्ट्रपिता तो कसला? नवा राष्ट्रपिता  आता आला म्हणूच खरचं सांगतोय तुम्हाला बस्स झालं गांधींना आता रिटायर्ड करा! -सतीशकुमार पडोळकर

मनुस्मृती पुरुस्कृत दुसऱ्या प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर आपण आहोत का? -डॉ.सतीशकुमार पडोळकर

  मनुस्मृती पुरुस्कृत दुसऱ्या प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर आपण  आहोत का?  -डॉ.सतीशकुमार पडोळकर  सन १९४९ च्या २५ नोव्हेंबर रोजी, राज्यघटनेचा मसुदा पूर्ण तयार झाल्याचा आनंद संविधान सभेतील सर्वच सदस्यांना असतांना, या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख म्हणून संविधनाचे महत्वाचे शिल्पकार असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मात्र अस्वस्थ होते. लोकशाहीवादी राज्यघटनेच्या भवितव्याविषयी ही अस्वस्थता आपल्या भाषणातून व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “माझ्या मनात आज आपल्या देशाच्या भवितव्याचेच विचार आहेत. भारतास संसदीय कार्यपद्धती माहीतच नव्हती, असे नाही. बौद्ध संघ साऱ्याच संसदीय कार्यपद्धतींचे पालन करीत आणि या पद्धती बौद्धांनी तत्कालीन राजसभांकडून घेतल्या होत्या, असे मानण्यास जागा आहे. ही लोकशाहीवादी पद्धती भारत कालौघात हरवून बसला. त्यामुळेच अशी दाट शक्यता वाटते की, आपली नव्याने जन्माला आलेली लोकशाही वरवर पाहता अबाधित भासेल, पण वास्तवात तिचे रुपांतर हुकुमशाहीत, एकाधिकारशाहीत होईल. या दुसऱ्या शक्यतेचा धोका खरोखरच अधिक दिसतो.”  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेला हा ध...

मंगळवेढे भूमी संतांची - डॉ.सतीशकुमार पडोळकर

  भारतीय इतिहासाचा गौरवशाली वारसा असणारी ‘मंगळवेढा’ नगरी ही धर्म, अध्यात्म, साहित्य, समाजप्रबोधन व नैतिक राजकारणाची जगभर छाप सोडणाऱ्या महापुरुषांची भूमी आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक व भक्तीच्या क्षेत्रात एक विधायक घुसळण करणारी व विवेकाचा आवाज बुलंद करणारी मंगळवेढ्याच्या मातीत उगवली. अशा या हाडामासाच्या माणसांनी देशाच्या तत्कालीन सांस्कृतिक, अध्यात्मिक व सामाजिक रूढी-परंपरेच्या विरोधात बंड पुकारले. ‘विद्रोह’ हा या मातीचा गुणधर्म आहे. संत व महापुरुषांच्या पदस्पर्शानॆ व कार्यांनॆ पावन झालेली ही भूमी. मंगळवेढा ही नगरी प्राचीन कलावैभवाची साक्षीदार आहे. इथं बुद्ध, जैन, नाथ, शैव-वैष्णव अशा अनेक संस्कृती व संप्रदायाचे भग्न अवशेष सापडतात. या मातीत अनेक विचार वाढले, रुजले व मानवतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले. मंगळवेढ्यात इ.स. १०६ ते इ.स. १८१८ च्या काळात चालुक्य, देवगिरीचे यादव, कलचुरी, बहामनी, अदिलशाही, छत्रपती शाहू अनेक राज्यकर्त्यांचा अंमल होता. याच मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्यात १८ नोव्हेंबर १६६५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज व राजा जयसिंग यांची भेट झाली होती....